Pages

http://picasion.com/gl/7Lbx/

सुस्वागतम तंत्रगुरू ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो

विविध शैक्षणिक साहित्य


 २री ते ४थी

 विषय * गणित
➤शै साहित्याचे नाव दरवाज्यातील कोनमापक y
लागणारे साहित्य  डिजीटल बोर्डवर अथवा दरवाज्या मध्ये ९० अंश अथवा दरवाज्या पुर्ण उघडत असेल तर १८० अंश कोन बनवणे 
अंदाजे खर्च ..२००₹
➤कृती * डिजीटल प्लेक्सवरील कोनमापक दरवाज्यात चिकटवणे अथवा  जमीनीवर दरवाज्यात पेंट करून कोनमापक बनवणे मुलांना मोजण्यास सांगणे
➤उपयुक्तता  :१)-कोनमापन सहज समजते
२)काटकोन व लघुकोन सहज समजण्यास मदत होते
३)झाडांच्या फाद्या मधील कोनही दाखवतात
४) जमीनीला संमातर कोन सहज काढतात
४) हसत खेळत संवगड्यासह परिसरातील कोन  दाखवतात
       
वर्ग 1 ते 7

मॅग्नेटिक बोर्ड
साहित्य= पत्रा, मॅग्नेट
किंमत =60 रू
बहुपयोगी असे हे साहित्य आहे.
1)मॅग्नेटचा उपयोग करून चाचणी बोर्डवर लावायची
2)अंक, संख्या वाचन प्रभावी घेता येईल (आय कार्ड उपयोग करून अंक कार्ड तयार होते. मागे ब्लेड लावा वे)
3)कल्पकतेने बरेच घटक या द्वारे दाखवता येतात.

                 भौमीतीक पाटी
              
साहीत्य –
पांढरा अॉईल पेंट १०० मिली, २ ईंची १८ खिळे, १०-१२ रबर..
खर्च – ८०₹
कृती-
प्रथम भिंतीवर १×१ फुट आकाराचा चौरस पेन्सिलने आखून घ्या. आता त्या चौरसाच्या चारही बाजूंवर २-२ इंच अंतरावर ड्रील मशीनीने छिद्र पाडा. आखलेल्या भागावर पांढरा रंग मारा व सोकू द्या. रंग पूर्णपणे सोखल्यावर छिद्र  पाडलेल्या ठिकाणी स्क्रु फीट करा.
झाले तुमचे साहीत्य तयार…
उपयुक्तता-
या भौमितिक पाटीवरुन आपण मुलांना निरनिराळे आकार रबराच्या सहाय्यातूनी तयार करुन घेता येईल..
यामध्ये चौरस, आयत, त्रिकोण पतंग ईत्यादी आकृत्या तयार करता येतात..
➤ सम  /  विषम  संख्या
                इयत्ता  1,2, 3
      एक साधी  काडी घ्या. .हातातील  गोळ्या. , दगड दोन्ही  बाजूला  एक एक  करत  ठेवा  …..
हातात एकही  दगड. , गोळी न उरल्यास ती संख्या  सम , …………1 गोळी  वा दगड  उरल्यास  ती संख्या  विषम……

ज्ञानरचनावाद

वर्ग – पहीली ते चौथी
➤ विषय – प्रथम भाषा ( मराठी )
➤ शैक्षणिक साहित्याचे नाव –
      वाचन लेखन कार्ड व पट्ट्या
शैक्षणिक साहित्य निर्मिती साठी आवश्यक साहित्य –
   . पांढरे कोरे कागद , प्राणी पक्षी वस्तू यांची चित्रे, रंग , स्केच पेन, डिंक किंवा फेवीकॉल,रद्दी वह्यांचे पुठ्ठे इत्यादी
अंदाजे साहित्य निर्मिती खर्च रूपये शंभर

 साहित्य निर्मिती कृती –
रद्दी वह्यांचे पुठ्ठे घेऊन त्यावर पांढरे कोरे कागद चिकटवून घेणे. विविध चित्रे त्यावर चिकटविणे जे चित्र चिकटविले आहे त्याचे नाव स्केच पेनने लिहीणे.
अशाच प्रकारे सर्व कार्ड आणि वाचन लेखन पट्ट्या विद्यार्थ्यांच्या मदतीने मार्गदर्शन करत बनवले .

शैक्षणिक साहित्य उपयुक्तता –
वाचन तयारी  वाचनाची दिशा समजते साठी तीन अथवा चार चित्रांची चित्र पट्टीचे वाचन करुन घेणे
गटातील वस्तु अथवा चित्रातूण पाहूणा ओळखात
चित्र चित्र जोडी लावून वाचन 🌞🌞🎈🎈🌺🌺🌹🌹🔦🔦
चित्र शब्द जोडी लावणे
🐘हत्ती
🐠मासा
🐚शंख
🐫ऊंट
शब्दपट्टयांचे वाचन
घेणे
शिकविलेल्या अक्षरांपासून शब्द तयार करा.
याशिवाय पुढील विषयांवर वाचन लेखन घेता येईल
घरातील वस्तूंची नावे * झाडांची नावे * वाहनांची नावे * दप्तरातील वस्तूंची नावे * प्राणी व पक्षांची नावे * पालेभाज्या व फळभाज्या यांची नावे * खेळ , खेळाडू आणि खेळण्यांची नावे * पाच मित्र व मैत्रिणींची नावे * वर्गातील वस्तूंची नावे * किराणा दुकानातील वस्तूंची नावे * फुले व फळे यांची नावे * जेवणातील पदार्थांची नावे * कडधान्यांची नावे * घरातील माणसांची नावे
विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे या वाचन लेखन कार्ड आणि पट्ट्या यांच्या मदतीने रचनावादी पद्धतीने ज्ञान आत्मसात करतात .
शिवाय साहित्य निर्मिती मध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले असल्यामुळे त्यांचा शिकण्यासाठीचा उत्साह आणि आनंद पाहण्यासारखाच असतो.
विद्यार्थ्यांनी स्व-अनुभवातून प्राप्त केलेले ज्ञान जलद आत्मसात होणारे आणि चिरकाल टिकणारे ठरते .
सर्वांना ज्ञानरचनावादातून अध्यापनासाठी शुभेच्छा !
➖➖➖➖
प्लास्टिकच्या चम्मचचा उपयोग small व capital अल्फाबेट करीता वापर करणे
  साहित्य :-प्लास्टिक चम्मच,फिक्स ओ पुल स्टीकर पेज ,ट्रांस्फेरेंट व पांढरे चम्मच
खर्च:-एकूण 24 रुपये
कृती:-चम्मच घेऊन त्यावर फिक्स ओ पुल पेपर वरील अल्फाबेट चिकटविने व अल्फाबेटाचा सराव घेणे
उपयोग:- मुळाक्षरे सराव
वनस्पतीचे अवयव 👬👬
😳 एक चौकोन पृष्टाचा डबा घ्या .
😇 त्याला मागील बाजुने वरच्या भागात पृष्ट लावा
😁 डब्याला वरच्या भागात मध्यभागी गोल छिद्र पाडून एक बॉटल लावा
:Dबॉटलच्या झाकनाला  मधोमध छिद्र पाडा .
💐 पान ,
फुल ,
मुळ ,
फांदी ,
खोड ,
फळ
लिहीलेल्या कागदाच्या पट्ट्या तयार करा .
🌠 डब्यावर मुळ चिपकवले .
🌠 बॉटल मधे एखादे छोटे झाड टाकले .
तयार केलेल्या पट्ट्या शोधुन त्या अवयवांच्या जवळ धरून , अवयवांचे नाव विद्यार्थी घेतील .
🌠💐🌠💐🌠💐🌠
स्वस्त , त्वरित  तयार होणारे शैक्षणिक साहित्य म्हणजे
➤वर्ग .  6 वा
➤विषय  – इंग्रजी
➤शै.साहित्याचे नांव – कॅलेंडर
➤लागणारे साहित्य – कार्डबोर्ड (पुठ्ठा) ,  सेंच्युरी पेपर , स्केचपेन , प्लास्टीक चा एक तुकडा ,पीन  (ripit) गोंद,कटर
अंदाजे खर्च – 20 ते 30 रूपये

🍁कृती🍁
👉कार्डबोर्ड ची एक शिट घेऊन कटर ने त्याच्या तीन वर्तुळाकृती disc कापून घ्या.
👉मोठी ,मध्यम व सर्वात लहान .
तिनही disc वर सेंच्युरी पेपर चिपकवा .
👉मोठ्या disc वर 1ते 31 पर्यंत अंक लिहा.
👉मधल्या disc  वर बारा महीन्यांची नांवे लिहा .
👉सर्वात लहान disc वर वारांची नावे लिहा .
👉खाली मोठी ,त्यावर मधली व सर्वात वर लहान disc ठेवा .
👉घड्याळ च्या मोठ्या काट्या प्रमाणे एक pointer घेऊन त्याच्या एका टोकाला छिद्र पाडा
👉तिनही disc च्या मध्यभागी छिद्र पाडून pointer मधून पीन घातल्यावर ती तिनही disc मधून टाका .
आता आपले कॅलेंडर तयार झाले आहे .
जी तारीख ,वार,महिना असेल त्या प्रमाणे disc फिरवून pointerठेवावा.
🍁उपयुक्तता 🍁
प्रत्यक्ष साधन पाहून व स्वतः साधन हाताळल्यामुळे मुलांना तारीख सांगताच मुले योग्यरित्या discसरकवून तारीख,वार,व महिना दाखवितात व ज्ञानाचे दृढीकरण होते .
स्वतः शैक्षणिक साधन बनवून त्याचा अध्यापनात वापर केल्यामुळे वेगळा आनंद मिळतो !
टिप -pointer कचर्यातून सापडला !   


                प्रदर्शन फलक
              
वर्ग– १-८
खर्च – – १२५₹
विषय- सर्व
कृती-
थर्मॉकॉल शिट घ्या. थर्मॉकॉल शिटवर वर्तमान पत्र फेव्हीकॉल ने चिपकवा. थर्मॉकॉल शिट एवढाच वेलवेट कापड घेवून फेव्हीकॉल च्या सहाय्याने शिटवर चिपकवा. तुमचा प्रदर्शन फलक तयार.
एका शिटचा आकार लहान वाटत असल्यास तुम्ही दोन शिट एकमेकांना जोडून मोठ्या आकाराचा फलक बनवू शकता..
उपयुक्तता–
प्रदर्शन फलकावर तुम्ही विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर, पेपर कटींग, चित्रकला स्पर्धा प्रदर्शन, वाढदिवसाच्या शुभेच्छा ग्रिटींग,
म्हणजे एकप्रकारे विद्यार्थी संचयिका प्रमाणे त्याचा वापर करु शकता..
:
➡ वर्ग  ५/६ ➡विषय….गणित ➡साहित्य….चित्रकार्ड ➡घटक……समान  पाया  असताना  व अंश  वेगळे  असताना अपूर्णांकाचा  लहान  मोठे पणा ठरविणे . ➡ साधारणतः  विध्यार्थ्यांना असे सांगतात की समान  पाया असताना अंश  वेगळे  असेल  तर ज्याचा  अंश  मोठा  तो अपूर्णांक मोठा  असतो .               परंतु  विध्यार्थ्यांचा संबोध  स्पष्ट व दृढ होण्यासाठी संकल्पना  स्पष्ट  होणे आवश्यक  आहे .नाहीतर  फक्त  सांगितले  म्हणून समजून  न घेताच ठरविणे  चुकीचे  होउ  शकते .अत्यंत सोपी  पध्दत  व साधे  चित्रकार्ड  वापरून हि संकल्पना स्पष्ट  करता येते . ➡उदा.५/८ व ३/८ ➡८पाया असुन ,८चित्रकार्ड घेऊन ५ कार्ड वेगळ्या  रंगाने व३ कार्ड  वेगळ्या रंगाने रंगवून ज्या  रंगाची कार्ड जास्त  तो अपूर्णांक  मोठा हे विध्यार्थी  स्वतः  समजून  शिकतात.
मी वर्गातील फरशीवर ब्लॅक बोर्ड कलर दिला त्यावर 1ते100पर्यत अंक व a to z alphabet लिहीले
फायदा: 1)पाटी आणायचे काम नाही दप्तरातील आेझे कमी झाले
2)विद्यार्थ्यांचे अक्षर सुंदर झाले
➖➖➖➖
:
* वर्ग * १ते ४
विषय 
मराठी ,गणित ,इंग्रजी
* शै साहित्याचे नाव *
लोंखडी ठोकळ्या पासुन वाक्य बनवा ,टप्प्याने येणा-या संख्या ,इंग्रजी शब्द जुळवा.
* लागणारे साहित्य .(बिल्डींग अँज लर्निंग अँक्टीव्हीटी तत्व )
   *अंदाजे खर्च  :-१०००ते २०००
  * कृती :- शाळेच्या खिडक्यांच्या ग्रील मध्ये ४ इंचाचे ठोकळे बसवुन त्याच्या चारही बाजुस अक्षर लेखन करावे व ते ठोकळे फिरते राहतील असे ठेवावेत
उपयुक्तता ..१)मुले सहजपणे वाक्य तयार करतात
२)टप्याने येणा-या संख्या शोधतात टप्पा सहज सांगतात
३) इंग्रजी शब्द जुळवुन वहीत लिहतात
४) साहित्य कायम स्वरूपी वापरता यैते कधीच खराब होत नाही अक्षरे अंक बदलु शकतो
    :
शाळेत मी एकाच भिंतीवर 4 घड्याळ लावले त्यात भारत,पाकिस्तान,इंग्लैंड,अमेरिका यांचा वेळ सेट केला यामुळे 4 देशातील वेळेचा फरक मुलांना माहित होतो व देशांमधे वेळेत फरक आहे ही संकल्पना दृढ़ होते
खर्च 240 रुपये
साहित्य 4 घड्याळ
घड्याळ संख्या आपण वाढवू शकतो
➖➖➖➖
:
* वर्ग * २री ते ४थी
          * विषय * गणित
          * शै साहित्याचे नाव अंकशिडी
          * लागणारे साहित्य  डिजीटल बोर्डवर तयार केलेली २ बाय २ आकारातील अंकशिड्या ..फासे व सोगट्या अंदाजे खर्च ..५००₹
   * कृती * डिजीटल प्लेक्स वर अंकशिडी बनवणे अथवा जमीनीवर पेंटीग करणे चार मुलांना एकत्र बसवुन फास्याच्यां सहाय्याने सापशिडी प्रमाणे खेळण्यास सांगुन संख्येच्या घरातील क्रिया करण्यास सांगावी
✏ उपयुक्तता  :१)-गणिताच्या चारही मुलभुत क्रिया सहजपणे करतात
२)बेरीज गुणाकार असल्यास शिडी मिळते
३) वजाबाकी ..भागाकार क्रिया असल्यास  रिटन यावे लागते ..
४) हसत खेळत संवगड्यासह गणित शिकतात..
समान लांबीच्या कागदाच्या पट्ट्या घेवुन भिन्न अंश छेद असलेल्या अपुर्णांक यांची तुलना, लहान मोठेपणा प्रात्याक्षिकाने ओळखणे..
➖➖➖➖
खिडक्या बंद करण्यासाठी त्याच मापाच्या दोन पट्ट्या तयार करणे.
🔷 उपयुक्तता 🔷
त्यामधे
1 आरोग्याच्या सवयी
2 मूल्यशिक्षण
3  प्राणी
4 पक्षी
5  फुले   6 फळे 7 वाहाने
8 भाज्या
9 भौमितिक आकार
10 संख्या dhyan
11 स्वर व्यंजने
12 चित्रे व शब्दपटट्या
13 अक्षरे व स्वरचिन्हे
14 बाराखडी
15 जोडशब्दवाचन
16 इत्यादी
आपण आपल्या कौशल्य्याने कुठलाही घटक दोन भागात विभागून स्वयंअध्ययनास प्रेरित करू शकतो.
हे एक टिकाऊ dhyan रचनावादी शैक्षणिक साहित्य आहे.
:
⭐ वर्ग 1 ते 5 ⭐
⭐विषय —– भाषा , गणित , परिसर अभ्यास. ⭐
🔷 शै. साहित्याचे नाव 🔷
     👉🏽माझा आनंददायी तक्ता 👈🏽
🔷 साहित्य —- पातळ प्लायवूड, ब्रश, काळे किंवा पांढरे साधे कापड, नट, बोल्ट , लोखंडी सळी किंवा 1/2 इंची पी व्ही सी पाईप, अडीच फूट, 4 लाकडी चक्रे ( 3 इंच व्यास), हॅंडल इत्यादी.
🔷अंदाजे खर्च 🔷
पाचशे ते सहाशे रूपये
🔷 कृती 🔷
12 इंच by 14 इंच by 10 मापाची एक लाकडी फ्रेम तयार करणे. पुढील बाजूस 4 इंच by 5 इंच मापाचे काप घेणे. व तो भाग कापून टाकणे. अशा प्रकार च्या दोन खिडक्या तयार करणे. वरील डाव्या बाजूस 2इंच by 3 इंच by मापाचा आडवा कप्पा तयार करणे. वरील दुसऱ्या बाजूस 2 इंच by 7 इंच मापाचा आडवा कप्पा तयार करणे. या दोन्ही कप्प्यांमधे शब्दपटट्या सरकवता येतील अशी रचना करणे. खालील दोन्ही खिडक्यांना सुद्धा पटट्या सरकवता येतील त्या साठी फ्रेम बसविणे डाव्या बाजूने डावी पट्टी व उजव्या बाजूने उजवी पट्टी सरकवता येईल अशी रचना करणे. आतमध्ये कापडी रोल बसविण्यासाठी खाली व वरती आडवे स्टील किंवा पी व्ही सी दोन रॉड बसविणे. रोल सरकवता यावा यासाठी दोन्ही रॉडना चाके बसविणे. काळ्या कपड्याची 11 इंच रूंदीची घटकाच्या व्याप्ती नुसार लांबी तयार करून घेणे. त्यावर दोन्ही खिडक्यांच्या मापाचे डाव्या व उजव्या बाजूने चौकोन तयार करणे.
➖➖➖➖
वापरून टाकलेला प्लास्टिक च्या ग्लास वापरून सुन्दर डिजाइन
एक प्लास्टिक चा ग्लास त्यावर लावण्यासाठी लेस
आणि स्टेपलर ने पीना मारायच्या किंवा दोरा वापरून लेस सिवुन घ्यायाच्या
आणि प्रत्येक ग्लास मधे led लावून डेकोरेशन साठी तसेच दिवाळी मधे कंदील म्हणून याच वापर होवू शकतो
विद्यार्थयाना नावनिर्मितीचा आनन्द मिळतो
➖➖➖➖
👭👬सुक्ष्मदर्शित्र 👭👬
😀 श्रीखंड खाल्ल का कधी ?
होय म्हणाले , मग ते आणता कशात ?
:Dडब्यात ना ,
तोच डबा शाळेत पोहचवा .
खाली बर का 😁😁:D:D
😳 तो एका बाजला चौकोन कापा 👆 , त्या समोर डावी व उजवीकडे छिद्र पाडा ,
त्यातून धांड्याचा चोपडा सर आत टाका , तो फिट्ट बसवा ,त्या धांड्यावर काच चिपकवा
म्हणजे प्रकाशाच्या परावर्तनासाठी त्याचा उपयोग होइल .
डब्यावर पारदर्शक कागद चिपकवा .
मागील बाजूवर एक काडी लावून त्याला वर फुटलेल्या दुर्बिन चा एक भाग लावा .
👌👌👌👌👌👌👌
झाले सुक्ष्मदर्शित्र तयार
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सोपे , सरळ , प्रभावी शैक्षणिक 
कोणतेही साहित्य। न वापरता आपण केवळ तोंडी संवादातुन मुलांना कार्यप्रवण व विचार  करायला लावु शकतो👪👪जसे१)  १शब्द देवुन वाक्य      २) दोन शब्दापासुन वेगवेगळी वाक्ये।    ३) चित्र वाचन।       ४ )शब्दापासुन गोष्ट तयार करणे ५) दिनचर्या सांगा ६) बातमी तोंडी सांगा ७) Where there is a wish ;there will be a way
ठिबक सिंचन…..
साहीत्य –
बिस्लेरीच्या खाली बॉटल्स. जाड धागा..
कृती-
बिस्लेरीच्या खाली बॉटल घ्या..
त्यांना बुडामध्ये छिद्रे पाडा. त्या छिद्रांमध्ये जाड धागा टाका व त्यामध्ये पाणी भरून झाडांच्या मुळांपाशी ठेवून द्या .
उपयुक्तता –
शाळेमध्ये ठिंबक सिंचन तयार होईल.. मुलांमध्ये झाडांबद्दल प्रेम निर्माण होईल.. टाकावूतून टिकाऊ तयार होईल..
➖➖➖➖
☀बेरीज चक्की☀
विद्यार्थ्यांना बेरीज शिकविण्यासाठी उपयुक्त आहे.
🔅साहित्य
🔅गाळणी 2
🔅रिकामा खोका
🔅पाईप तुकडा
🔅काचेच्या गोळ्या
खर्च 70 रुपये
साहित्य = हेन्डमेड पेपर कात्री फेबीकोल  जम्बो मार्कर साधे वर्तुळ पटी पेन्सिल सेलोटेप etc
साहित्य तयार करतांना विषय भाषा = 1जोडशब्द विरुधार्थी शब्द समानार्थी —
गणित = सम विषम बेरीज वजाबाकी चढता उतरता
क्रम असे अनेक——
परिसर अभ्यास = पाळीव प्राणी जिल्हे तालुके शेजारील गावे असे अनेक
इंग्रजी = alfhabet oppsit day numbers  असे अनेक👏🏻 पुढील कृती = प्रथम 9अंश त्रिज्या वर्तुळ घ्यावे नंतर प्रतेयकी 1अंशानी कमी घेणे असे प्रत्यक वर्तुळ घेणे एकूण  साधारण 5 वर्तुळ तयार करणे  वर्तुळ समोरासमोर घड्या करणे अस्या घड्या ष टकोन  तयार होईल असे चित्र दिसेल नंतर घड्या ळ   ला प्रमाणे घडी करत जा णे
➖➖➖➖
:
♻साहित्य निर्मिति   ♻
   🔹🔹सरकपट्टी🔹🔹
          हार्डबोर्ड वर चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूला लिखाण करून घ्यावे.दोन शब्दामधील “स” हे अक्षर सामाइक असेल.एका लोखंडी पट्टीवर “स” हे अक्षर लिहून ती पट्टी प्रत्येक शब्दापर्यन्त जाईल अश्या पद्धतीने हार्डबोर्ड कापून घ्यावा.आता स ची पट्टी मागच्या बाजूला धरून प्रयेक शब्दासमोर सरकवा.प्रत्येक वेळी दोन शब्द तयार होतील.एक स ने सुरु होणारा व एक स ने शेवट होणारा.
       उदा. पाऊ स दरा
    1)पाऊस
     2)सदरा
अश्या पद्धतीने बऱ्याच् शब्दांचे वाचन व लेखन कृतियुक्त सहभागाने घेता येईल.चला तर मग आपल्या कल्पकतेने नवीन सरकपट्टी बनवुया.

No comments:

Post a Comment